Pan shop has been closed for two and a half months due to lockdown.
Pan shop has been closed for two and a half months due to lockdown.  
विदर्भ

कोरोनाने लावला पानविक्रेत्यांना चुना; अडीच महिन्यांपासून दुकाने बंद 

सकाळ वृत्तसेवा

कुंभली (जि. भंडारा) : "खैके पान बनारसवाला, खुल जाये बंद अकल का ताला' हे डॉन या चित्रपटातील लोकप्रिय गीत खूप गाजले होते. परंतु, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनने पानावाला बाबूंच्या दुकानाला अडीच महिन्यांपासून टाळे लागले आहे. रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

कमी गुंतवणुकीत रोजगार देणारा, खूप काही कौशल्याची गरज नसणारा हा व्यवसाय हजारो लोकांसाठी जगण्याचा आधार ठरला होता. मोठ्या शहरासह लहान-मोठ्या गावांतही पानटपऱ्या थाटून तिथे चहा, खर्रा, पान विकून त्यांचा चरितार्थ चालत होता. कधी असे संकट ओढवेल आणि आपले दुकान अघोषित काळासाठी बंद पडेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. पण, कधी नव्हे ते कोरोनाने आपला रंग दाखवून पान विक्रेत्यांना चुना लावला आहे. 

पहिली टाळेबंदी घोषित झाली तेव्हापासून जवळपास अडीच ते तीन महिन्यांपासून चहा, खर्रा आणि पानाची दुकाने बंद स्थितीत आहेत. त्यामुळे अर्थार्जनाचे एकमात्र, साधन टाळेबंदीने हिरावल्याने हा व्यवसाय करणारे तसेच त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची होरपळ होत आहे. लग्नसराईच्या हंगामात विविध प्रकारच्या पानांची मोठी मागणी असते. गावात लग्न, स्वागत समारंभ असले की अनेक जण आपली फिरती दुकाने मंडपाच्या बाहेर लावून बसतात. परंतु, लग्नसुद्धा थाटामाटात व मोठ्या धूमधडाक्‍यात करण्यास बंदी आहे. 

वीस, पंचवीस लोकांत साधेपणाने लग्न आटोपले जात आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन दुरावले आहे. गावातील अनेक बेरोजगार तरुण या व्यवसायात आहेत. त्यांना या माध्यमातून चरितार्थाचे साधन उपलब्ध झाले होते. जेवण झाल्यावर मुखशुद्धीसाठी पान खाण्याची सवय असते. तर खर्रा, चहा पान या तलफ भागविणाऱ्या गोष्टी रोजच्या जीवनाचाच एक भाग झाल्या आहेत. मात्र, लॉकडाउनने या दुकानांना कुलूप असल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. 

लॉकडाउनने हिरावला रोजगार 

ग्रामीण भागात व शहरी भागात शेकडो कुटुंबे चहा व पान दुकानावर अवलंबून आहेत. आज, ना उद्या दुकाने उघडतील अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. सर्वच प्रकारची दुकाने खुली करण्यास शासनाने परवानगी दिली. परंतु, चहापानाच्या दुकानावर मात्र, निर्बंध आहेत. आतापर्यंतचे दिवस त्यांनी कसेतरी काढले. परंतु, दिवसेंदिवस रोजगार नसल्याने, कमाई नसल्याने जीवन जगणे कठीण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इतर व्यवसायाप्रमाणे सामाजिक अंतर, सुरक्षात्मक साधनांचा वापर करून आम्हालासुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT